Mumbai Indians : रोहित शर्माला स्वत:ला वाटतं नसेल की रिटेन व्हावं, मनोज तिवारीनं सांगितली मन की बात

Mumbai Indians : आयपीएलमध्ये (IPL) पाचवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचंप्लेऑफमधील आव्हान सर्वप्रथम संपलं. मुंबईच्या खेळाडूंना समाधानकारक कामगिरी न करता आल्यानं त्यांच्यावर ही वेळ आली. आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जाएंटसयांच्यात वानखेडे स्टेडियमवर मॅच होणार आहे. लखनौ सुपर जाएंटसला पराभूत करुन विजयानं आयपीएलमधील प्रवासाचा शेवट करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल. मुंबईच्या मॅनेजमेंटच्या निर्णयानुसार हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कॅप्टन करण्याचा मॅनेजमेंटचा निर्णय यशस्वी झाल्याचं दिसत नाही. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारीनंमोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा आणि अभिषेक नायरच्या व्हायरल व्हिडीओचा संदर्भ देत मनोज तिवारीनं भाष्य केलं. रोहित शर्माला देखील स्वत:ला वाटत नसेल की रिटेन व्हावं, असं तिवारीनं क्रिकबझच्या कार्यक्रमात म्हटलं.

मनोज तिवारी काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सनं कोणत्या चार स्टार खेळाडूंना आगामी आयपीएलमध्ये रिटेन करावं असा प्रश्न निवेदकानं विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना मनोज तिवारीनं सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला रिटेन करावं असं मत मांडलं. सूर्यकुमार यादव किंवा बुमराहकडे नेतृत्त्व दिल्यास मुंबईच्या वातावरणात कसा बदल होतो ते पाहा, असं तिवारी म्हणाला.परकीय खेळाडूंना देखील रिटेन करावं असं वाटत नाही. टीम डेविडला देखील रिटेन करु नये, असं मत असल्याचं तिवारीनं सांगितलं. पोलार्डची कमी भरुन काढण्यासाठी त्याला आणलं गेलं होतं. मात्र, तो अपेक्षेप्रमाणं कामगिरी करु शकला नाही, असं तिवारी म्हणाला.

T20 World Cup 2024: टी 20 वर्ल्ड कप सराव सामन्यांचं वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर, भारताची एकमेव मॅच कधी?

मनोज तिवारी पुढे म्हणाला की, असं वाटतंय की रोहितला स्वत:ला असं वाटत नसेल की रिटेन व्हावं. तिवारीनं रोहित शर्मा आणि अभिषेक नायर या दोघांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओचा दाखला देत वक्तव्य केलं. मनोज तिवारीन विरेंद्र सेहवाग समोरचं हे भाष्य केलं. केकेआरनं रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र, नंतर तो डीलिट करण्यात आला होता.

 

सूर्यकुमार यादव किंवा बुमराहला कॅप्टन करण्याचा सल्ला
मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये क्वालिफाय करु शकत नाही, असं म्हटलं होतं. मुंबई इंडियन्सनं सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराह या दोघांपैकी एकाकडे नेतृत्त्व द्यावं, असं मनोज तिवारीनं म्हटलं.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply