Mumbai Fire News : घाटकोपरच्या सागर बोनान्झा मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; २५ ते ३० दुकानांचा जळून कोळसा, एकजण जखमी

Mumbai Fire News : मुंबईतील घाटकोपर सागर बोनान्झा मार्केटमध्ये बंद असलेल्या २५ ते ३० दुकानांना भीषण आग लागली. या आगीत एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. 

मुंबईतील घाटकोपरमध्ये खोत गल्ली, सागर बोनान्झा मार्केट परिसरात रात्री अचानक दुकानांमध्ये आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली होती.

Ajit Pawar-Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी केली मागणी अन् अजित पवारांनी मंचावरुनच लगावला टोला; नेमकं काय घडलं?

या आगीची तीव्रता जास्त होती. त्यामुळे ही आग आजूबाजूला असणाऱ्या दुकानांना देखील लागली. यात २५ ते ३० दुकाने जळून खाक झाले आहेत. या दुकानांमध्ये शूज, झेरॉक्स मशीन, फोटो फ्रेम, मोबाईल ॲक्सेसरीज, कपडे तसेच विविध वस्तू होत्या. आगीमुळे त्या वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे.

या घटनेत तसेच पंधरा ते वीस जणांना रेस्क्यू करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहे. या आगीवर तब्बल सहा तासानंतर नियंत्रण मिळविण्यात यश मिळालं आहे.

या आगीत दुकान मालक संतोष सावंत (वय वर्ष ५४) यांना गंभीर दुखापत झाली आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. रात्रीच्या वेळी परिसर शांत होता, जास्त वर्दळ  नव्हती. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र मार्केटमधील २० ते २५ दुकानांचा जळून कोळसा झाला आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply