Mumbai Dam Water Level : मुंबईवरील पाणीसंकट दूर होणार, ७ धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा आजची आकडेवारी

 

Mumbai Dam Water Level : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईवरील पाणीसंकट दूर होण्याची शक्यता आहे. कारण मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सातही धरणक्षेत्रामध्ये सध्या चांगला पाऊस पडत आहे. यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या असेलली १० टक्के पाणीकपात आता दूर होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर पालिकेने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ३५.११ टक्के इतका झाला आहे. १५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ५,०८,१०८ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ३५.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. काल सातही धरणात ३० टक्के पाणीसाठा होता. कालच्या तुलनेत आजच्या पाणीसाठ्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Vishalgad News Today : संभाजीराजे छत्रपती यांना अटक करा; 'विशाळगडा'वरून राजकारण तापलं, आंदोलकांची तीव्र निर्देशने

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ५ धरण आणि २ तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दररोज ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

गेल्या महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. आता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईवर असलेले पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या मध्यावर आले असलो तरी देखील मुंबईसह राज्यात म्हणावा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे मुंबईसह प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा मागच्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ५.६८ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ५५.२३ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ७०.७३ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ३१.५५ टक्के पाणीसाठा

- भातसा - २८.७० टक्के पाणीसाठा.

- विहार - ५३.९९ टक्के पाणीसाठा.

- तुलसी - ७९.७० टक्के पाणीसाठा.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply