
जळगाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य, अशा साठ पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, शनिवारीही (१६ जुलै) धरणगाव तालुक्यातील काही पदाधिकार्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटाला समर्थन दिले आहे.
शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा वाद सध्या राज्यात सुरू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला आता चांगलेच धक्के बसत आहेत. रविवारी जळगाव तालुक्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले. शिवसेनेचे माजी जळगाव तालुकाप्रमुख तथा उपजिल्हा संघटक नानाभाऊ सोनवणे (दापोरीकर) यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती व सदस्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. उपजिल्हा संघटक नानाभाऊ सोनवणे यांनी रविवारी माजी मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ पदाचा राजीनामा दिला आहे. धरणगाव तालुक्यानंतर आता जळगाव तालुक्यातही शिवसेनेला मोठे धक्के बसत आहेत.
जळगाव शहरासह ग्रामीण मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे.तालुक्यातील तळागाळातील दीनदुबळ्या जनतेला विकासाची आस लागली आहे. माजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील हेच विकास करतील, असा आशावाद राजीनामा देणार्या शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. आम्ही जळगाव शहरासह ग्रामीण विकासाच्या मुद्यावर राजीनामा देत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. आता आम्ही साठ पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत. अजूनही काही पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार आहेत, असे सांगण्यात आले.
दरम्यान, सध्या भाजप-शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची उत्सुकता असतानाच आमदार गुलाबराव पाटील यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के असल्याचे संकेत मिळाले आहेत. आमदार पाटील यांनी शिंदे गटाची साथ घेतली असून, त्यांचा पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मधल्या काळात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकार्यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत कायम राहणार असल्याची ग्वाहीही दिली होती. शनिवारी (१६ जुलै) शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देत शिवसेनाला जय महाराष्ट्र केला आहे. पदाधिकार्यांच्या राजीनामासत्रामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
दरम्यान, जळगावमधील शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना, “सध्या राज्यभरात शिवसेनेच्या गावस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही नवीन पदाधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी व्हॉटसअॅपद्वारे राजीनामे पाठविले आहेत. जळगाव व धरणगाव तालुक्यांतील पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत, ते जळगावमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी नव्हते,” असे शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



