Mumbai : मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; पोलिसांकडून ५ जणांना अटक

Mumbai : मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी झालेल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्जचे जाळे पोहोचत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी यांचा समावेश असून आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, नशिल्या पदार्थांचे सेवन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र कोणता ड्रग वापरण्यात आला आणि तो कुणी पुरवला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये इव्हेंटशी संबंधित एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती आहे. तसेच १३ एप्रिल रोजी नेस्कोच्या व्हाइस प्रेसिडेंट (इव्हेंट्स अँड एक्झिबिशन्स) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या घटनेमागील ड्रग सप्लाय नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Mumbai : मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान ड्रग ओव्हरडोसमुळे २ विद्यार्थ्यांचा मृत्यू; पोलिसांकडून ५ जणांना अटक

Leave a Reply to Valentina4052 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *