Mumbai : मुंबईत हत्या प्रकरणांची मालिका; वडाळ्यात पत्नीची हत्या, अँटॉप हिलमध्ये २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला

Mumbai : मुंबईमध्ये हत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. कुर्ला येथे रिक्षात आसनावरून झालेल्या वादातून तरुणाची झालेली हत्या आणि मालवणीत तरुणाने पत्नीला ठार केल्याच्या घटना ताज्या असतानाच अशा आणखी तीन घटना समोर आल्या आहेत. अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात १७ वर्षांच्या दोन मुलांनी एका १५ वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. वडाळा येथे दारूसाठी पैसे देत नसल्याने झालेल्या वादातून पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. तर, अँटॉप हिल परिसरात सेक्टर सातमध्ये एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये काम करणारी तीन अल्पवयीन मुले डी. एन. नगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. १५ वर्षांच्या मुलाचे इतर दोघांसोबत वारंवार खटके उडायचे. तो आपल्याबाबत मालकाचे कान भरत असल्याचा दोघांना संशय होता. पैशावरून त्याच्यासोबत भांडण व्हायचे. दोन दिवसांपूर्वी त्याच्यासोबत याच कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनी या मित्राची गळा दाबून हत्या केली. कुणाला कळू नये म्हणून दोन दिवस खोलीतच मृतदेह ठेवला. अखेर शनिवारी त्यांनी, या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांच्या तपासात हा बनाव उघड झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

वडाळा परिसरात राहणाऱ्या महेश वाड याचे दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी कविता हिच्यासोबत भांडण झाले. दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने महेशने कविता हिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या कविता हिला उपचारासाठी कुठेच नेले नाही. तिच्या घरच्यांना हा प्रकार समजताच त्यांनी कविता हिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून महेश याला अटक केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Mumbai : मुंबईत हत्या प्रकरणांची मालिका; वडाळ्यात पत्नीची हत्या, अँटॉप हिलमध्ये २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला

Leave a Reply to Lewis2374 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *