Mumbai Crime : मुंबईत ड्रग्जची तस्करी करणाऱ्याला अटक; ४१ लाखांचे कोकेन जप्त

Mumbai Crime : मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरातील एमआयजी क्लब जवळील रामकृष्ण परमहंस मार्ग भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या ड्रग्स तस्कराला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीची चौकशी केली असता तो नायजेरियन तरुणांकडून ड्रग्स विकत घेत असल्याचे निष्पन्न झाल्याने खेरवाडी पोलिसांनी नायजेरियन तरुणाला देखील अटक केली आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून 41 लाख रुपये किमतीचा कोकेन हा अमली पदार्थ हस्तगत केला आहे. सध्या दोन्ही आरोपी खेरवाडी पोलिसांच्या ताब्याचा असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहे.

खेरवाडी पोलिसांनी ड्रग्स विक्री करणारा आणि त्याला ड्रग्स पुरवणारा अशा दोघांविरोधात कलम ८ (क) सह २१ (ब), एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील एमजी क्लब परिसरातील रामकृष्ण परमहंस मार्ग रस्त्यावरील भिंती शेजारी एक व्यक्ती कोकेन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांना मिळाली होती.

Pune News : पुणे पोलीस आयुक्तांचा मारणे टोळीला दणका, गुन्हे शाखेने केली मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले त्याची अंग झडती केली असता त्याच्याजवळ तीन ग्राम इतके कोकेन बेकायदेशीर रित्या आढळून आले. खेरवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने आरोपी जुनैद नईम स्वान, (२६ वर्षे,) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तो वांद्रे पश्चिम चिंबई भागातील नायजेरियन तरुणांकडून कोकेन खरेदी करत असल्याचे समजले.

खेरवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नायजेरियन तरुणाला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यातील ४१,००,०००/- किमतीचा एकूण ८१ ग्रॅम 'कोकेन' हा अंमली पदार्थ हस्तगत"केला. सध्या दोन्ही आरोपी खेरवाडी पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे हे दोघे नेमके कोकेन हा अमली पदार्थ मुंबईत कुठून आणायचे या टोळीत अजून कोणाचा सहभाग आहे का याबाबतही खेरवाडी पोलीस तपास करत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply