Mumbai Court : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच मुश्रीफांना मोठा दिलासा; कोर्टानं अटकेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई : मनी लॉण्डरिंगचाआरोप असलेल्या आणि नुकत्याच राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या हसन मुश्रीफ यांना २२ ऑगस्टपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुश्रीफ यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

ईडीने (ED) मुश्रीफ यांच्याविरोधात दोन कारखान्यांतील व्यवहाराबाबत कारवाई सुरू केली आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या काही मालमत्तांवरही छापे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

न्यायालयाने काल त्यांना दिलेल्या अंतरिम संरक्षणात वाढ केली. तसेच ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत तपास अधिकाऱ्यांनी सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई सत्र न्यायालयात मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. जावेद, आबिद आणि नावेद या तिन्ही मुलांना न्यायालयाने १९ जुलैपर्यंत दिलासा दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply