Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंकडे विधानसभेसाठी आले १०० अर्ज! भुजबळांविरोधात 7 जण इच्छुक, विधानसभा कोण गाजवणार?

Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ९०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या अर्जाची छाननी या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती दिली जात आहे. इच्छुक मराठा उमेदवारांनी आता छगन भुजबळ यांच्याविरोधात कंबर कसली आहे.

भुजबळांच्या विरोधात सात उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे-पाटील यानी लोकसभा निवडणुकीतही मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते, नंतर त्यानी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन देखील केले होते.
जराने पाटील यांचे सहाय्यक श्रीराम कुरणकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, कारण सात मराठा उमेदवारांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच, माजलगाव येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळके यांनीही जाहीर केले आहे की ते निवडणूक लढवणार नाहीत, कारण गेल्या वर्षी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांनी पराभवाची शक्यता आहे.

श्रीराम कुरणकर यांनी सामितले की, "अर्जदारामध्ये विद्यमान आणि माजी आमदार, मत्री, जिल्हा प्रमुख, तसेच

जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. काहींना उमेदवारी हवी आहे तर काहींना निवडणुकीत जरांगे-

पाटील यांचे समर्थन हवे आहे. विशेष म्हणजे, अनपेक्षितपणे मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज

आले आहेत.

Pune-Miraj Train Route: पुणे-मिरज रेल्वे मार्ग तयार, क्षमता मोठी मात्र गाड्यांची वानवा; खडतर प्रवास कायम

जरांगेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रमुख नेते प्रयत्नशील-
गेल्या आठवड्यात जरांगे-पाटील यांची भेट घेतलेल्यांमध्ये माजी राज्य मंत्री सुरेश नवले, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, भाजप नेते रमेश पोकळे, माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर, माजी आमदार संगीता ठोंबरे आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजीतसिंह यांचा समावेश आहे.

जरांगे-पाटील यांना पाठिंबा मिळवण्यासाठी विविध पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्नशील आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघातूनही सहा इच्छुक उमेदवारांनी जरांगे-पाटील यांना अर्ज केले आहेत, ज्यामुळे चव्हाण यांना देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळेच मागच्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण जरांगे पाटील यांना भेटायला अंतरवली सराटी येथे आले होते असा दावा देखील कुरणकर यांनी केला.
भाजपच्या मीनल खतगावकर यांनी जाहीर केले आहे की, "नायगाव (नांदेड) मतदारसंघातून भाजपची तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे मी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे-पाटील यांच भेट घेऊन मी त्यांच्या समर्थनाची अपेक्षा केली आहे."

राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह

"मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाधिक 'भाजप नेते आणि आमदार जरांगे-पाटील यांना भेटत आहेत, कारण या दोन भागात पक्षाविरुद्धचा आक्रोश लक्षात घेता त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहे," असे श्रीराम कुरणकर यांनी सांगितले.

जरागे-पाटील यानी इच्छुकाना त्याची माहिती आणि अर्ज २० ते २४ ऑगस्ट दरम्यान सादर करण्याचे आवाहन केले होते. "आम्हाला २१ ऑगस्ट रोजी निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर करायचा होता, परंतु आता निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने तो पुढे ढकलला गेला आहे, असे एका कार्यकत्यनि सागितले. अर्जदारामध्ये मराठा समाजासह लिंगायत, मुस्लिम, ओबीसी, तसेच अनुसूचित जातीचे लोकही आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply