Mumbai Crime: मुंबई हादरली! घरात घुसून दार लावलं, चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार

Mumbai : मुंबईमध्ये १७ वर्षांच्या मुलाने एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घरामध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत या मुलाने महिलेवर बलात्कार केला. या घटनेमुळे मानखुर्दमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दमध्ये पीडित महिला (२७ वर्षे) आपल्या पती आणि मुलांसोबत राहते. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास महिला घराजवळ आपल्या मुलांसोबत बसली होती. यावेळी आरोपी मुलगा तिच्यावर लक्ष ठेवून होता. महिलेला घरामध्ये गेल्याचे पाहून तो तिच्या पाठीमागे गेला. घरामध्ये घुसल्यानंतर आरोपीने घराच्या दरवाज्याला कडी लावली.

आरोपीने चाकूचा धाक दाखवत आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी घराबाहेर पडला आणि त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावून फरार झाला. महिलेने घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला पण दरवाजाला कडी लावलेली होती.

महिलेने आरडाओरडा करत मदतीची मागणी केली. तेव्हा शेजारचे धावून आले. त्यांनी दरवाजा खोलून महिलेला बाहेर काढले. महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला. त्यानंतर महिलेने पतीसोबत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. आरोपी घटनेपासून फरार होता तो घरी येणं टाळत होता. त्याने फोन देखील बंद ठेवला होता. पोलिस त्याच्या मागावरच होते. अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे सध्या त्याची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply