
Mumbai Cirme News : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा ई-मेल (E-Mail) पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत (Mumbai News) सध्या एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याचं कळत आहे. सरफराज मेमन असं या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती परदेशात प्रशिक्षण घेऊन आलेली असून धोकादायक असल्याने सतर्क राहावं अशा सूचना एनआयएने केल्याचं कळत आहे. त्यानंतर आता राज्यातल्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुंबईत एक धोकादायक व्यक्ती फिरत असून त्यासंदर्भात माहिती देणारा ई-मेल एनआयएकडून मुंबई पोलिसांना करण्यात आला आहे. NIA कडून मुंबई पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सतर्क राहण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनआयएकडून ई-मेल आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
सरफराज मेमन नावाची व्यक्ती मुंबईत पोहोचल्याची NIA ची माहिती
NIA ने आपल्या ईमेलमध्ये 'धोकादायक' या शब्दाचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना सतर्क राहायला सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NIA ने आपल्या ई-मेलमध्ये संशयित व्यक्तीचं नाव सरफराज मेमन असल्याचं सांगितलं असून ही व्यक्ती मुंबईत पोहोचली असल्याचं एनआयएने ई-मेलमध्ये म्हटलं आहे.
संशयित व्यक्तीचं चीन हाँगकाँग, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण
मुंबईत फिरत असलेली संशयित धोकादायक व्यक्ती इंदूरची राहणारी असून या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्ती खूपच धोकादायक ठरु शकते, असंही एनआयएने म्हटलं आहे. एनआयकडून मुंबई पोलिसांना करण्यात आलेल्या ई-मेलमध्ये या संशयित व्यक्तीची कागदपत्रही पाठवली आहेत. मेलसोबत NIA ने आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि एलसी कॉपीही जोडल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई पोलिसांनी इंदूर पोलिसांसोबतही संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे
मुंबईतील सुरक्षा वाढवली
मुंबई कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असतं. 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे. मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


