मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी ओला कॅब चालकाला अटक

 

मुंबई : १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला कॅब चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चालकाला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरे पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आलात होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे . 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गोरेगावमध्ये २९ वर्षीय ओला कॅब चालकाने २५ मे रोजी अल्पयीन मुलीचा अश्लील हावभाव करत विनंयभग केला होता. त्यानंतर पीडित मुलीने पालकांच्या मदतीने आरे पोलीस ठाण्यात आरोपी ओला कॅब चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत आरोपी ओला कॅब चालकाला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी मुळचा बिहारचा असून नाव मुरारी कुमार सिंग आहे. त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहे का, याची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन पांचाळ यांनी सांगितली आहे.

दरम्यान,२५ मे रोजी मुंबईतील गोरेगाव येथे २९ वर्षीय ओला कॅब चालकाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील हावभाव करत विनयभंग केला होता. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.तसेच याआधी साकीनाकामध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यावेळी नराधमाने पीडित महिलेवर अमानुष अत्याचार केले होते.हे साकीनाका प्रकरण ९ सप्टेंबर २०२१ रोजी घडलं होतं. त्यानंतर पोलीस यंत्रणा महिला सुरक्षा सतर्क झाली होती. दरम्यान, गोरेगावमधील घटनेमुळं मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply