MNS News : मोठी बातमी! मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा तापणार; मनसे आक्रमक, गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?

मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण चांगलंच तापलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर भोंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. मनसेकडून राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे गुढीपाडव्याला पक्षाच्या मेळाव्याला काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून पुन्हा एकदा राजकारण पेटणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भोंग्याच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या १७ व्या वर्धापनाच्या दिवशी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे राज्यातील विविध मुद्द्यांवर हात घातला होता.

या सभेत राज ठाकरे यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना, 'भोंगे प्रकरणात राज्यभर कार्यकर्त्यांवर केसेस केल्या आणि मुख्यमंत्रिपद गेलं. बोललो ना वाटेला जायचं नाही, असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते.

राज ठाकरे गुढीपाढव्याच्या दिवशीच्या भाषणात काय बोलणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून सूचक ट्विट केलं आहे.

मशिदीवरील भोंग्याचा मुद्द्यावरून ट्विट करताना कीर्तिकुमार शिंदे यांनी सौदी अरेबियातील एका निर्णयाचा दाखला दिला आहे. कीर्तीकुमार शिंदे म्हटले की, 'जागतिक इस्लामी संस्कृतीचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात रमजानमध्ये मशिदींवरील भोंग्यांवर-ध्वनिक्षेपकांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे'.

'भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते, हा मुद्दा इस्लामी देशाला पटला! 'सेक्युलर' भारत देशाला कधी पटणार? असा सवाल कीर्तिकुमार शिंदे यांनी केला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply