Milk Tanker Accident : शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

Milk Tanker Accident : उरुळी कांचन - जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात घडलाय. वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना गुरूवारी सांयकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलीय.

कुंवर पाल (वय वर्षा ३५, बरेली उत्तरप्रदेश) असे अपघातात मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. तर वैभव शिवाजी जामदार (वय वर्ष ३४ बेलवाडी, इंदापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदर्शन धनराज माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत चालक कुंवर पाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी वाघापूरजवळील उरुळी कांचनकडे दुधाचा टँकर निघाला होता. यावेळी उरुळी कांचनजवळ असलेल्या शिंदवणे घाटात, तीव्र वळण लागले. या तीव्र वळणावर चालक कुंवर पाल याचे टँकरवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे टँकर थेट कठडा तोडून थेट २० फुट खाली कोसळला.

या अपघातात चालक कुंवर पाल आणि त्याच्याशेजारी बसलेले रूट सुपर वायझर हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, हवालदार सुदर्शन माने आणि स्थानिक नागरिकांनी दोघांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच चालक कुंवर पाल याचे मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या अपघातात वैभव जामदार हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply