
मुंबईतील भाजपा मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी महाभारतातील युद्धाचा दाखला देत राज्यातील राजकीय परिस्थिती उलगडून सांगितली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘कृष्ण’ तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘कर्ण’ असा केला. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत कृष्ण आणि कर्ण हे दोघेही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर होण्यापासून आता कोणीही थांबवू शकत नाही, असं विधान शेलार यांनी केलं.
यावरून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. भारतीय जनता पार्टीचा इतिहास कच्चा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. शेलारांच्या विधानाचा समाचार घेताना अंधारे म्हणाल्या की, “या लोकांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांची पात्रांची निवड चुकलीय. कृष्णाचं पात्र फडणवीस रंगवत आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांचा अभ्यास कच्चा आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सध्या धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत. एक असा धृतराष्ट्र ज्याने आधी ढीगाने आरोप केले. पण आता सगळं कळत असूनही ‘बंद डोळे… बंद ओठ… बंद त्या पापण्या… आज प्रिये मी खरी प्रीत पाहिली तुझ्यात” असं म्हणणारा हा धृतराष्ट्र आहे. ईडीने आरोप केलेले सर्व लोकं आता त्यांच्याकडे आहेत. पण धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. सगळ्यांना सामावून घेत आहे.”
“आशिष शेलार, किरीट सोमय्या हे सर्व शकुनी आहेत, हे शकुनी असे आहेत, जे खरं काय आहे? ते सांगत नाहीत. हेच लोकं भावना गवळी आणि प्रताप सरनाईक यांना माफिया गँग बोलत होते. भावना गवळी त्यांच्या तथाकथित महाशक्तीला राखी बांधायला जातात, ज्याने राज्यात भूकंप येऊ शकतो, हे माहीत असतानासुद्धा धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. धृतराष्ट्र हा सध्या हतबल आणि सत्तातुर आहे. तो सत्तेसाठी इतका हपापलेला आहे की, त्याला न्याय काय? अन्याय काय? सत्य काय? आणि असत्य काय? या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे. त्यामुळे फडणवीस मला कृष्ण नाही तर धृतराष्ट्र वाटतात” अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

