
Mawal Tragedy : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे १६ जून रोजी इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल कोसळला . यामुळे भीषण दुर्घटना घडली. सुमारे ५० हून अधिक पर्यटक पुलावर असताना, काही क्षणातच पुलाचा मधला भाग कोसळला आणि पर्यटक थेट नदीत कोसळले. फादर्स डे आणि रविवारची सुट्टी असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होती. माने बाप लेकही पुलावर गेले होते. मात्र, सेलिब्रेशनपूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलं.
फादर्स डेला वडील अन् मुलाचा मृत्यू
कुंडमळा पूल कोसळल्यानंतर काही क्षणात पुलावरील पर्यटक खाली कोसळले. या अपघातात एका बाप लेकाचाही समावेश होता. रोहित माने आणि त्यांचा मुलगा विहान माने या दोघांना आपला जीव गमवावा लागला. फादर्स डेचं सलिब्रेशन करण्यासाठी दोघेही बाप लेक कुंडमळावर गेले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. फादर्स डेच्या दिवशीच दोघांचाही मृत्यू झाला. यामुळे परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे. याशिवाय या अपघातात चंद्रकांत साठले यांचाही अपघातात मृत्यू झाला. तर, चौथ्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
|
Pune : शिक्षणाच्या पंढरीत धक्कादायक प्रकार, पुण्यातील १३ शाळा अनधिकृत, २४ शाळा जागेवरच नाहीत |
पावसाळ्यानिमित्त निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या पुलावर गर्दी करत असतात. रविवार असल्यामुळे त्या ठिकाणी तोबा गर्दी जमली होती. दुपारी ३ च्या सुमारास त्या ठिकाणी धो धो पाऊस पडत होता. पूल ३० वर्ष जुना असल्यामुळे जीर्ण अवस्थेत होता. कोणत्याही क्षणी पडेल, अशा स्थितीत होता. काही मिनिटात गर्दी वाढू लागली. पुलाला गर्दीचं वजन पेलवलं गेलं नाही. काही सेंकदात पूल खाली कोसळले आणि नदीत काही जण पडून वाहून गेले
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ मदतीसाठी धावून गेला. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. सध्या जुन्या पुलाची डागडुजी का केली नाही? खबरदारी का घेतली गेली नाही? असा सवाल विरोधक आणि स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




