Maval : इंद्रायणी नदी दुथडी भरली, वाडीवळे गावचा साकव पूल वाहून गेला; दळणवळण ठप्प

Maval  : मावळात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पाण्याच्या प्रवाहात वाडीवळे गावातील साकव पूल वाहून गेला. 

साकव पूल वाहून गेल्याने परिसरातील सात ते आठ गावांचा दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. तात्पुरता बांधलेल्या वाहून गेलेला पुलाची पाहणी स्थानिक नागरिकांनी केली. तसेच लवकरात लवकर पुलाची पुनर्बांधणी करून  या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी स्थनिक ग्रामस्थांनी केली.

Rain Update : आंबा घाटात दरड काेसळली, साता-यात बरसला; काेयना धरणावर 1996 च्या स्थितीची चिंता

दरम्यान साकव पूल वाहून गेल्याने नागरिकांनी अथवा ग्रामस्थांनी या भागातून पूलाच्या अलीकडे अथवा पलीकडे जाण्याचा प्रयत्न करु नये. काेणीही धाेकादायक पत्करु नये असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply