मुंबई: दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि मध्यवर्ती भाग असलेल्या भायखळा परिसरातील उमरखाडी (Umarkhadi, Byculla) येथील रहिवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने (म्हाडा) उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास (Cluster Redevelopment) अत्यंत वेगाने मार्गी लावण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव आता राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या महत्त्वकांक्षी प्रस्तावानुसार, अनेक दशके जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये अत्यंत लहान, म्हणजेच केवळ १८० चौरस फुटांच्या घरात जीव मुठीत धरून जगणाऱ्या हजारो रहिवाशांना थेट ५०० चौरस फुटांची अत्याधुनिक आणि हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
काय आहे प्रकल्पाचे स्वरूप आणि नियोजन? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उमरखाडी परिसरातील सुमारे ६.२३ एकर (किंवा अंदाजे २० हजार चौरस मीटरहून अधिक) भूखंडावर हा पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार आहे. या क्षेत्रात सुमारे ७० ते ८० वर्षे जुन्या असलेल्या आणि जीर्ण झालेल्या उपकरप्राप्त (सेस - Cess) इमारती, म्हाडाच्या पीएमजीपी (PMGP) इमारती, म्हाडा पुनर्रचित आणि अधिग्रहित इमारती तसेच काही खासगी मालकीच्या मिळून एकूण ८१ जुन्या इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींमध्ये मिळून तब्बल १,९२८ हून अधिक रहिवासी आणि लहान-मोठे व्यापारी वा व्यावसायिक गाळेधारक वास्तव्यास आहेत.
या संपूर्ण परिसराचा सुनियोजित विकास करण्यासाठी म्हाडाने हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्याचे ठरवले आहे. पहिल्या टप्प्यात या परिसरातील ३६ इमारतींचा पुनर्विकास केला जाणार असून, त्यासाठीचा प्रस्ताव म्हाडाने अधिकृतपणे गृहनिर्माण विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित इमारतींच्या पुनर्विकासाचा सविस्तर प्रस्तावही लवकरच तयार करून तो मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. बीडीडी चाळींच्या (BDD Chawls) धर्तीवर कंत्राटदाराची नियुक्ती करून स्वतः म्हाडाकडून किंवा सी ॲण्ड डी (C&D) प्रारूपाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
४ एफएसआय (FSI) आणि गगनचुंबी इमारतींची निर्मिती: या समूह पुनर्विकास प्रकल्पामुळे उमरखाडी परिसराचे संपूर्ण रूप पालटणार आहे. या संपूर्ण भूखंडावर कमाल ४ इतका एफएसआय (FSI) उपलब्ध होणार असल्यामुळे येथे भव्य आणि गगनचुंबी इमारती (High-Rise Towers) उभारल्या जाणार आहेत. जुन्या व जीर्ण इमारतींच्या जागी निर्माण होणाऱ्या या नवीन इमारतींमध्ये रहिवाशांना मोफत ५०० चौरस फुटांची प्रशस्त आणि सुसज्ज घरे दिली जाणार आहेत.
विशेष म्हणजे, या पुनर्विकास प्रकल्पातून केवळ रहिवाशांचे पुनर्वसनच होणार नाही, तर म्हाडाला अतिरिक्त बांधीव क्षेत्रफळ मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यातून म्हाडाला अंदाजे साडेसात लाख चौरस फूट किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळावर हजारो अतिरक्त घरे उपलब्ध होणार आहेत, जी भविष्यात म्हाडाच्या लॉटरीद्वारे सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातील. शासन स्तरावरून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर दक्षिण मुंबईतील समूह पुनर्विकासाच्या चळवळीला आणखी वेग येईल, यात शंका नाही.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




