Maratha Reservation : दोन्ही डोळ्यांनी अंध, स्वतःला अर्धे गाढून घेतलं, मराठा आरक्षणासाठी अनोखं आंदोलन

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या  मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी उग्र स्वरुपाची आंदोलने होत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील माढा  तालुक्यातील जामगाव या गावातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं आहे. विशेष म्हणजे या तरुणाने कंबरेपर्यंत स्वत:ला गाडून घेतलं आहे. मालोजी चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत 'बेमुदत अर्धसमाधी आंदोलन' सुरू राहणार असल्याचे भूमिका मालोजी चव्हाण यांनी मांडली. 
   
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. माढा तालुक्यातील जामगावमधील एका दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाने देखील अर्धसमाधी आंदोलन सुरु करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका मालोजी चव्हाण यांनी घेतली आहे.

Raju Shetti : राजू शेट्टींच्या 'आक्रोश' यात्रेचा धसका, कोल्हापुरात चार साखर कारखान्यांकडून ऊसाला विनाकपात दर देण्याची घोषणा!

मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास शासन जबाबदार 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. पहिला मराठा कुटंबाकडे भरपूर जमीन होती, हळूहळू लोकसंख्या वाढत गेली. त्याच्यानंतर जमीन कमी होत गेली. यामुळं मराठा समाजातील तरुणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठा समाजाला शिक्षणात नोकरीत आरक्षण नाही, त्यामुळं तरुण आत्महत्या करत असल्याची प्रतिक्रिया मालोजी चव्हाण यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास शासन जबाबदार असल्याचे मालोजी चव्हाण यांनी सांगितले. सरकारनं आंदोलनाची दखल नाही घेतली तर माझी जीवंत समाधी होईल असे चव्हाण म्हणाले. माझं आंदोलन हे बेमुदत असल्याचे मालोजी चव्हाण यांनी सांगितलं.

मराठा समाजासमोर आता करेंगे या मरेंगे अशी स्थिती

मराठा समाजासमोर आता करेंगे या मरेंगे अशी स्थिती असल्याचे जामगावचे सरपंच सुहास काका पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला तरुण अर्धसमाधी आंदोलन करत असल्याचे पाटील म्हणाले. या लढ्याला सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सरकारनं समाजावर ही वेळ आणली न पाहिजे. सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे पाटील म्हणाले. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला नेतेमंडळी जबाबदार

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. समाजाची मागणी रास्त आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला नेतेमंडळी जबाबदार असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे यांनी मांडली. ही लढाई गरजवंत मराठ्यांची आहे. मराठा समाजातील नेत्यांना काही जाण असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असे जगदाळे म्हणाले. तर मराठा समाजाला सरकारनं कायमच कोडींत पकडले आहे. समाजातील अनेक तरुण मुलांची लग्न होत नाहीत. कोणी मुली द्यायला तयार नाही. विद्यार्थ्यांसमोर विविध समस्या आहेत, त्यामुळं सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं असे मत किरण चव्हाण यांनी व्यक्त केले. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply