Manoj Jarange Patil : ठरलं तर मग! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार, ठिकाण आणि तारीखही ठरली

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण  मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील  यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार बाहेर काढले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषणाची घोषणा करत राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या ४ जूनपासून ते उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण बेमदत असणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उपोषणाबाबत घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जरांगे पाटील संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर येथे आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांनी उपोषणाची घोषणा करत तारीख आणि ठिकाणाची माहिती दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'सगेसोयरेसाठी पुन्हा उपोषण आणि आंदोलन करणार आहे. ४ जून रोजी सकाळी ९ वाजता अंतरवाली येथे उपोषण सुरू करणार. तर ८ जून रोजी नारायण गडावर सभा घेणार आहे. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. ६ कोटी मराठा समाजाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे.' तसंच, 'मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. १० टक्के आरक्षण दिले ते कुणाच्याही फायद्याचे नाही. त्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे.' असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले.

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश; तब्बल 30 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पीएम मोदींवर निशाणा देखील साधला. त्यांनी सांगितले की, 'मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्हा जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या ४-५ जणांमुळे आली. आम्ही भाजपविरोधी नाही.' तसंच, 'सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार. जर सरकारने मान्य केले तर आम्ही राजकारणात पडणार नाही.', असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यासोबत, 'मला आता समाजाला आवाहन करण्याची गरज वाटत नाही. मराठा समाजाला आता सगळं काही माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेत आहेत. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करतील.' असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तसंच, 'लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा समाज नाही. आम्ही कुणाचाही प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचे आम्ही आवाहन केले नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडण्याचे आवाहन मी केले आणि कोणाला पाडायचे हे मराठा समाजाला चांगलेच माहिती आहे.', असे त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply