Pune Rain Update : पुरंदरमधील पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा संजय जगताप यांचे आदेश

Malshiras : पुरंदर तालुक्यात मागील महिनाभरापासून अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्वच पिकांच्या, तसेच रस्ते, पूल आदींच्या नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईबाबत शासनाकडे अहवाल सादर करण्याचा आदेश आमदार संजय जगताप यांनी शासनाच्या महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या . 
तसेच, याबाबत तालुका व जिल्हा यंत्रणेने कार्यवाही करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले. पुरंदर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील महिनाभरात, तर सध्या तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने व सततच्या ढगाळ हवामानामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून १५ दिवसांपूर्वी झालेल्या प्रत्यक्ष स्थळपाहणीतून र हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र, सध्या होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाटाणा, बाजरी, कांदा, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

Aditya Thackeray : “ही निवडणूक आहे, लढाई नाही, त्यामुळे राजकीय पक्षांनी…”; छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!


सिताफळावर पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. याबरोबरच डाळिंब, अंजीर, पेरूवरही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली सर्व पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचे सरसकट पंचनामे करून विमा कंपन्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी.

महसूल, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी तातडीने पंचनामे करावेत. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार जगताप यांनी केल्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply