Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ

Mumbai : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राऊत  यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीमधील मित्र पक्षांवर थेट निशाणा साधत मोठा दावा केला आहे.

राऊत यांनी सांगितले की, महायुतीतील Nationalist Congress Party आणि शिवसेना गटातील काही आमदार लवकरच भारतीय जनता पार्टी  मध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांनी थेट आकडाही सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

“ राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. काही आमदार भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत आणि लवकरच याबाबत मोठी हालचाल दिसेल,” असा दावा राऊत यांनी केला.

कधी होणार प्रवेश ?
राऊत यांनी सूचक संकेत देत सांगितले की, हा पक्षांतराचा सिलसिला लवकरच सुरू होऊ शकतो, त्यामुळे येत्या काही दिवसांतच मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात.
पूर्वीही केला होता दावा,

याआधीही राऊत यांनी अशाच प्रकारचे दावे केले होते. मात्र, प्रत्येकवेळी भाजपकडून हे दावे फेटाळण्यात आले आहेत.

राजकीय वातावरण तापलं,
या विधानामुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता असून विरोधकांनीही यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता प्रत्यक्षात किती आमदार पक्षांतर करतात आणि कोणत्या पक्षाला याचा फटका बसतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ

Leave a Reply to Lance3791 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *