Maharashtra SSC Result 2023 : प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; दुपारी एक वाजता होणार जाहीर

Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे २ जून २०२३ रोजी जाहीर होणार आहे. 

बोर्डाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेच्या गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च - एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

दरम्यान, परीक्षेनंतर दहावीचा निकाल कधी लागणार? याची प्रतिक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली असून उद्या म्हणजेच शुक्रवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकाचं लक्ष लागलं आहे.

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागले. येथे विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

निकाल बघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचा रोल नंबर नीट बघून एंटर करणं आवश्यक आहे. आईचं नाव हे तुम्हाला इंग्लिशमध्ये टाईप करावं लागणार आहे. त्यानंतर येणारं बेसिक बेरीज किंवा वजाबाकीचं गणित सोडवून तुम्हाला निकाल बघता येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply