Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत तगडी फाईट होणार; उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, महायुतीची धाकधूक वाढली

Maharashtra Politics : विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच नार्वेकर अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.

त्यांच्यासोबत स्वत: उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रज्ञा सातव, सुद्धा उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास ५ ते ६ मतांची गरज असणार आहे. त्यामुळे आता या मतांची जुळवाजुळव नेमकी कशी केली जाते, यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.

Ladki Bahin Scheme : लाडकी बहीण योजनेतील दोन नियम बदलले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली घोषणा

दरम्यान, विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी विरोधकांसोबत बोलणी सुरू केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. पण उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी डाव टाकला. त्यांनी आपल्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली.

दुसरीकडे मिलिंद नार्वेकर विधानभवनात दाखल होताच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत चर्चाही केल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर नार्वेकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आहेत. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संसदीय राजकारणात हे पहिलेच पाऊल ठरणार आहे.

खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नार्वेकरांना पक्षप्रवेशाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. अगदी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या खासदाराविरोधातच मैदानात उतरवण्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र त्यात तथ्य आढळलं नाही. अर्थातच मिलिंद नार्वेकर यांनीनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असता, तर तो उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का ठरला असता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply