
औरंगाबाद: शिवसेनेतील राजकीय बंडाळीला मराठवाडय़ातून मोठय़ा प्रमाणात साथ मिळाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाडय़ातील १२ आमदारांपैकी आठ आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सुरत येथे असल्याने संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. यामध्ये कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातून पैठण येथील संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ, औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील सहा पैकी केवळ कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत हे एकमेव जिल्ह्यातील आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या वर्षां बंगल्यावरील बैठकीस हजर होते. सरकारस्थापनेपासून शिवसेनेवर नाराज असणारे भूम-परंडय़ाचे तानाजी सावंत यांचे भाजप नेत्यांबरोबर सूत जुळले होतेच. त्यांच्याबरोबर उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौघुले हेही शिंदे यांच्याबरोबर गेले आहेत. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, राहुल पाटील हे मात्र उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीस हजर होते.
नांदेडचे बालाजी कल्याणकर हेही सुरत येथे असून त्यांचा दूरध्वनीही दिवसभर बंद होता. बीड, लातूर व जालना या तिन्ही जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. मराठवाडय़ातील केवळ चार आमदार शिवसेना पक्षप्रमुखांच्या बैठकीस उपस्थित होते.
चंद्रकांत खरे यांची शंका!
औरंगाबाद जिल्ह्यातील हे आमदार शिंदे यांच्याबरोबर जाण्यापूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरी जेवणासाठी आले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हेही या वेळी त्यांच्यासमवेत होते. या घटनेबाबत बोलताना शिवसेना नेते खैरे म्हणाले,‘ रात्री संदीपान भुमरे यांच्या घरी आम्ही सारे होतो. तेथे आम्ही साऱ्यांनी जेवण घेतले. तेथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले. ते पलिकडेच्या खोलीत गेले. त्यांचे आपसात काय बोलणे झाले माहीत नाही. जेवायचे मी थांबलो आहे, आता चला असे म्हटल्यावर सारे आले. तेव्हा सुरू असणाऱ्या कुजबुजीवरून काही तरी घडते आहे, याची शंका आली होती. पण हे असे सारे असेल असे वाटले नाही.’
शहर
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री! रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूरचा काही भाग व्यापला; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
महाराष्ट्र
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री! रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूरचा काही भाग व्यापला; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
गुन्हा
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
- चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला; रुग्णांचा डेटा हॅक, हॅकर्सची बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.






















Subscribe to my channel




