Maharashtra Politics : शपथविधीनंतर अजित पवार गटाचा वाद चव्हाट्यावर; पक्षातील कार्यकर्त्यांनी केली नवी मागणी

Maharashtra Politics : पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर अजित पवार गटाचा वाद चव्हाट्यावर वाद येताना दिसत आहे. केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही, त्यामुळे पक्षात नाराजीचं वातावरण दिसत आहे. आता पक्षातील कार्यकर्त्यांनी नवी मागणी केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना ‌राज्यसभा द्या, अशी मागणी होत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी अजित पवार यांना दिलं आहे.

 

सुनेत्रा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावं, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. तसा ठराव देखील सर्वानुमते मांडण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरातील पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते ठराव मांडण्यात आला आहे. सुनेत्रा अजितदादा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करावे. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Thane News : फी न भरल्यामुळे १०० विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

 

सुनेत्रा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद

सुनेत्रा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्यास बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल. त्यामुळे या ठरावाचा विचार केला जावा, अशी विनंती पक्षातील कार्यकर्त्यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं, यासाठी आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते आग्रही असल्याचं दिसत आहे. यंदा केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही.

लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली आहे. यामध्ये सुनेत्रा पवार १ लाख ८ हजार ४९० जास्त मतांनी पराभव झाला आहे. राज्यात अजित पवार गटाच्या फक्त एकच उमेदवाराचा विजय झालाय. परंतु केंद्रात त्यांना एकही मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण दिसत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिन सोहळा पार पडत आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply