Maharashtra Politics : 'शिवतीर्थावर काँग्रेसची सभा, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस', राहुल गांधींच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका

Maharashtra Politics : ''आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे, त्या ठिकाणी काँग्रेसची सभा होत असून त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे'', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आज ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, ''ज्या राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं.'' 

Aamshya Padvi Joins Shinde Group : ठाकरे गटाला मोठा धक्का; आमदार आमश्या पाडवींचा शिंदे गटात प्रवेश

उद्धव ठाकरे याना लक्ष्य करत ते म्हणाले, ''ज्या पक्षाकडे शिवसैनिकच नसतील तर ती कसली शिवसेना. शेकडो लाखो हजरो शिवसैनिकसोबत येत आहे. मग खऱ्याअर्थाने चुकीचा निर्णय कोणी घेतला, हे लक्षात येत आहे. ज्या काँग्रेससोबत इतकी वर्ष लढलो, त्यांच्यासोबत कसं बसायचं. आपण युतीत लोकसभा व विधानसभा लढलो. मग सरकार कोणाचं स्थापन व्हायला हवं होतं. पण निवडणुका होताच वरिष्ठ म्हणायला लागले की, आपल्याला सगळे दरवाजे उघडे आहेत. तेव्हा समजलं दाल मे कुछ काला है.''

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ''राजकारणात हे चालत नाही, विचारधारा पाळाव्या लागतात. स्वत:च्या खुर्चीसाठी मोहापोटी काहीजण वेगळा विचार करू लागले. अन्याय सहन करायचा नाही, हे बाळासाहेब बोलायचे. मग अन्याय जास्त होऊ लागल्यानंतर आम्ही पाऊल उचलले.''

दरम्यान, आज शिवाजी पार्कवर काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे.या सभेने राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply