Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टात उद्या होणारी सुनावणी पुढे ढकलली; 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लांबणीवर

मुंबईः राज्यातल्या सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार होती. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे.

शिंदे गटातल्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उद्या, दि. 31 जुलै रोजी सुप्रीम कोर्टा सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. ती सुनावणी कधी होणार, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यावर उद्या सुनावणी होणार होती. उत्तरात विधानसभा अध्यक्ष कोणता मुद्दा मांडणार होते, ते समजणार होतं. परंतु या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे.

Beed Accident : बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी; अपघातात एक जण जखमी...

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांनी अद्याप १६ आमदारांबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र शिवसेनेच्या सर्वच आमदारांना नोटीस पाठवलेली आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस पाठवलेली होती. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सुप्रीम कोर्टातल्या प्रस्तावित सुनावणीमध्ये काय निर्णय होते, हे पाहावं लागेल.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी उद्या मुंबई हायकोर्टात होणार आहे. याचिकाकर्ते सुनिल मोदी यांना सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात अपिल करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply