
Badalapur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच अनेक ठिकाणी महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. बदलापुरमधील महायुतीमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना पैशांच्या पाकिटांसह रंगेहात पकडण्यात आले. बदलापुरच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले.
|
|
बदलापुरात राष्ट्रवादीच्याउमेदवारांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिंदेसेनेनं केला आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याकडून पैशानं भरलेली पाकीटं वाटत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलं. त्यानंतर या ठिकाणी काही काळ शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे जोरदार राडाही पाहायला मिळाला.
बदलापुरच्या प्रभाग क्रमांक १ मधील शांतीनगर भागात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्ता पैशाने भरलेली पाकीट मतदारांना वाटत असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पैशांची पाकिटं वाटमाऱ्या या महिलांना रंगेहात पकडत त्यांना जाब विचारला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती दिली. या पाकिटांमध्ये तीन-तीन हजार रुपये भरण्यात आल्याचं सांगण्यात येतं. सध्या निवडणूक अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर काल निलेश राणे यांनी छापा टाकला होता. छाप्यात २५ लाखांची रक्कम सापडली होती. नितेश राणे विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली होती. नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, 'आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो. तो नियम सगळ्यांना लागणार.'
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

