Maharashtra Politics : नवी मुंबईत भाजपला मोठं खिंडार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

 

Maharashtra Politics : नवी मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप, काँग्रेसह इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी शिवबंधन हातामध्ये बांधलं. महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतल्या नेरुळ आणि बेलापूर येथील भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करत त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना आगामी निवडणुकीमध्ये ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *