Maharashtra Political News : छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात मनोमिलन?

Maharashtra Political News : लोकसभी निवडणुकीच्या तिकीटावरुन एकमेकांसमोबर उभे ठाकलेले अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे आज एकाच व्हॅनिटी व्हॅनमधून प्रवास करताना दिसले. दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झाल्याचा दावा केला जात आहे.

अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही नेत्यांच्या मनोमिलनासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही काही झालं नाही. मात्र आज अंबादास दानवे यांच्या व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले. दोघांनी वॅनिटी व्हॅनमधून प्रवासही केला.

छत्रपती संभाजीनगर हा वर्षानुवर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या बालेकिल्ल्यात दीड वर्षांपूर्वी मोठी पडझड झाली. सहापैकी पाच आमदार हे शिंदे गटासोबत निघून गेले. ठाकरे गटाला पुन्हा उभारी घेण्यासाठी मातोश्रीवरून प्रयत्न सुरू आहेत. असं असलं तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन प्रमुख नेत्यांमध्ये चार दिवसांपासून उमेदवारीच्या मुद्द्यावरून वाद दिसून आला.
 
आता अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे एकत्र प्रवास करत असले तरी हा प्रवास लोकसभेपर्यंत कायम राहणार का? की लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरुन दोन्ही नेते वेगळा मार्ग निवडणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कोण इच्छुक?

इम्तिताज जलील, विद्यमान खासदार

डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री, भाजप

अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

संदिपान भुमरे, रोहयो मंत्री, शिंदे गट

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

चंद्रकांत खैरे, ठाकरे गट नेते

विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply