Maharashtra : कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra : कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे यांची जादू कायम असल्याचं बघायला मिळत आहे. सकाळच्या एक्झिट पोलमध्ये संभाव्य आमदार म्हणून मतदारांनी नितेश राणे यांनाच पुन्हा एकदा पसंती दिली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संदेश पारकर हे निवडणूक रिंगणात आहेत.

भाजपचे आक्रमक नेते म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे. कणकवली मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत. सध्या संभाव्य आमदार म्हणून त्यांना कौल मिळत असल्याचं एक्झिट पोलमधून बघायला मिळत आहे. त्यामुळे भाजपला कणकवलीत यश मिळण्याची शक्यता आहे. गेल्याकाही दिवसापासून नितेश राणे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. त्याबद्दल त्यांना अनेक वेळा घरचा आहेर देखील मिळाला. असं असूनही नितेश राणे हे कणकवलीच्या जनतेच्या मनात खरे उतरताना दिसत आहेत.

कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी लढत झाली. भाजपचे नितेश राणे हे गेल्या 2 विधानसभेपासून याठिकाणी आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्याशिवाय नितेश राणे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा, विकासकामाचा मुद्दा आणि लाडकी बहीण योजना या सगळ्याच फायदा कुठेतरी त्यांना होताना दिसणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply