Madhya Pradesh Crime News : १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, पुलावरून ढकललं; पीडितेची मृत्यूशी झुंज

Madhya Pradesh Crime News : एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर सोमवारी ग्वाल्हेर जिल्ह्यातील डाबरा भागात सामूहिक बलात्कार  करून पुलावरून फेकून देण्यात आल्याची घटना घडली होती. याच दिवशी एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर तिच्या पालकांना बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना देखील घडली होती. लगी कोचिंग क्लासला जात होती. तेव्हा दोन तरुणांनी तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळून नेलं. नंतर तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. त्यानंतर तिला पुलावरून खाली फेकून दिलं. या घटनेतील आरोपी फरार  आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे. 

पीडितेला पूलावरून खाली फेकलं

मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने एका स्थानिक रहिवाशाने तिच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. तिला ग्वाल्हेर येथील रुग्णालयात दाखल केलं. पीडिता पूलावरून खाली फेकली गेल्यानंतर बचावली आहे.

 

या घटनेत पीडितेला तिच्या बरगड्या आणि पायांमध्ये फ्रॅक्चर झालंय. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खोल जखमांसह तिला अनेक गंभीर दुखापती झाल्या आहेत. पण सध्या पीडित मुलीची प्रकृती आता स्थिर आहे.

फरार आरोपींचा शोध सुरू

पीडिता शुद्धीवर आल्यानंतर बुधवारी पोलीस पथकाने पीडितेचे जबाब नोंदवले आहेत. दोन फरार आरोपींवर गुन्हा दाखल झालाय. तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस  आलीय.

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलाय. फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply