Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! २ तासांचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत; ३९०० कोटींचा प्रकल्प, जाणून घ्या सरकारचा मास्टर प्लॅन

Mumbai : मुंबईकरांना दिलासा देणारे वृत्त समोर आलेय. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मढ आणि वर्स्वोबा यादरम्यानच्या खाडी पूलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण आणि वन विभागाकडून अंतिम मंजूरी मिळाली असून दोन महिन्यात कामाला सुरूवात होईल. मालाडचा मढ आणि अंधेरीचा वर्सोवा यादरम्यान प्रवासासाठी दोन तासांचा वेळ लागतो. वाहतूक कोंडी असेल तर यामध्ये आणखी भर पडते. पण २२ किमीच्या या मार्गावर आता खाडी पूल तयार होणार आहे. त्यानंतर हे अंतर फक्त १० ते १५ मिनिटांवर येणार आहे. वर्सोवा आणि मढ या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता या मार्गावर ३९०० कोटींचा प्रोजेक्टस सरकारकडून हातात घेण्यात आला आहे.

मढ आणि वर्सोवा हा २२ किमीचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागतात. पण वाहतूककोंडी असेल तर या प्रवासाचा वेळ आणखी वाढतो. पण खाडीवर ब्रिज तयार झाल्यास हा प्रवास फक्त १० मिनिटात पूर्ण होणार आहे. केबल स्टेड ब्रिज बांधण्यात येणार आहे. यामध्ये डेक केबलद्वारे सहारा देण्यात येईल. हा ब्रिज २ किमी लांबीचा असेल. वर्सोवा खाडीवर हा ब्रिज तयार करण्यात येणार आहे. बीएमसीकडून हा ब्रिज बांधण्यात येत आहे.

Pune : पुण्यात फॉर्च्युनरमध्ये मित्राच्या हत्येचा थरार! जवळून डोक्यात गोळी झाडून खून; घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट

वर्सोवा आणि मढ या ठिकाणी सर्वात वेग प्रवास सध्या जेटी, बोटद्वारे केला जातो. या प्रवासासाठी फक्त ५ मिनिटांचा वेळ लागतो. तर १० ते १५ रूपये खर्च करावे लागतात. पण जर बाईक असेल तर खर्च आणखी वाढतो. ही बोट चारचाकी वाहनांसाठी नाही. त्याशिवाय पावसाळ्यात बोटसेवा बंद असते. वर्सोवा आणि मढ या मार्गावार रस्तेमार्गे ९० ते १२० मिनिटांचा कालावधी लागतो.

BMC कडून या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून फेब्रुवारी २०२३ मध्ये याला परवानगी मिळाली. कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) ची मंजुरी आणि कंत्राटदाराची नियुक्ती देखील मिळाली आहे. या ब्रिजसाठी काही खारफुटीची झाडे तोडणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मंजुरी प्रलंबित होती. आता सरकारला या कामासाठी मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे लवकरच कामाला सुरूवात होणार आहे. २०२६ मध्ये या कामाला सुरूवात राहण्याची शक्यता आहे. हा पूल तीन वर्षांत पूर्ण करण्याचे प्लान सरकारचा आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *