Lonavala News : नवरात्रौत्सवात लोणावळा परिसरात वाहतुकीत बदल, एकविरा देवीच्या भक्तांच्या सोयीसाठी निर्णय

Lonavala News : नवरात्र उत्सवानिमित्त कार्ला गडावरील श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. राज्याभरात भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. त्यामुळे नवरात्रौत्सवातील भाविकांची गर्दी लक्षात घेता या भागात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेत ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. कार्ला फाटा ते वेहेरगाव येथील श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पूर्णवेळ अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढली आहे.

Pune Bangalore Accident : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयानक अपघात; पोलिसासह तिघांचा जागीच मृत्यू

याशिवाय जुना पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी यात्रा काळातील शेवटचे तीन दिवस म्हणजेच 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान जुन्या पुणे मुंबई लेनवर वडगाव फाटा ते लोणावळा व पुणे लेनवर खंडाळा - कुसगाव टोलनाका ते वडगाव दरम्यान सर्व जड अवजड वाहनांना बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सर्व वाहन चालक चालकांनी व नागरिकांनी या आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply