Lok Sabha Result:अजित पवारांचे भवितव्य लोकसभा निकालावर अवलंबून, काका बिघडवणार पुतण्याचं विधानसभेचं गणित?

Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्या मंगळवार जाहीर होणार आहेत. यापूर्वी अनेक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. एक्झिट पोलने राजकीय नेत्यांचे टेन्शन आधीच वाढवले. एक्झिट पोलने एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली असली तरी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सध्या तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात एकूण ५ जागा लढवल्या आहेत. त्यापेकी केवळ एक जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर काही संस्थांनी अजित पवार यांना शून्य जागा मिळणार म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे काका शरद पवार यांचा पक्ष तोडून भाजपला पाठिंबा दिलेले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापेक्षा जास्त जागांवर दावा करायचा असेल तर अजित पवार यांच्या राष्ट्र‌वादीसाठी लोकसभेचे निकाल महत्वाचे आहेत. मात्र एक्झिट पोलनुसार निकाल लागला तर राष्ट्रवादीला जास्त जागांवर दावा करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत 28 जागा एकट्याने लढवणारा भाजप विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांची मागणी करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसे बोलून देखील दाखवले आहे.

Eknath Shinde: शिंदे सरकारला दुष्काळाचे गांभीर्यच नाही; माजी मुख्यमंत्र्यांची शिंदेंवर टीका

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राबादेतच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत, तर अजित पवार अडचणीत सापडले आहेत. एबीपी-सीव्होटरच्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 22 किंवा 23 जागा मिळू शकतात, तर एनडीएला 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

28 जागांवर लढणाऱ्या भाजपला 17 जागा मिळू शकतात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 तर अजित पवार गटाल केवळ एक जागा किंवा शून्य मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीत काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 आणि शरद पवारांना 6 जागा मिळू शकतात. अपक्ष उमेदवारालाही एक जागा मिळू शकते.

टीव्ही १च्या सर्वेक्षणाबाबत बोलताना शिंदे गटाला 4 जागा देण्यात आल्या आहेत, तर अजित पवार गटाला मूल्याका राहण्याची शक्यता आहे भाजपला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला या सर्वेक्षणात 25 जागा मिळण्याची शक्यता आहे त्यात ठाकरे गटाला 14 राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला 5 जागा मिळतील, अस अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सर्वेक्षणानुसार निकाल लागलेत तर अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असेल. हे निकाल शरद पवार याच्यासात देखील महत्वाचे आहेत. खरी राष्ट्रवादी कुणाची यावर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. बारामतीसारख्या जागेवर कुटुंबच लढत असल्याने काका-पुतण्यातील लढाई अस्तित्वाची देखील आहे. बारामतीत येथे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होती.

जागावाटपावरून गोंधळ -

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा होऊ नये, यासाठी 80 ते 90 जागा देण्याच्या शब्दाची भाजपला आतापासूनच आठवण करून द्यावी, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मोठा भाऊ आहे, त्यामुळे सर्वाधिक जागा लढेल आणि मित्र पक्षाचा सन्मान केला जाईल. असे म्हटले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply