Lok Sabha Election Result : नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची वेळ आणि तारीख ठरली, 8 जूनऐवजी या दिवशी घेणार शपथ?

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांची एनडीएने  संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचा शपथविधी सोहळा ८ जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची नवीन तारीख आणि वेळ समोर आली आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा ८ जून ऐवजी ९ जूनला म्हणजे रविवारी होणार आहे.

भाजपचे नेते नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ ९ जून रोजी घेणार आहे. हा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. याशिवाय अनेक परदेशी राष्ट्रप्रमुखांनाही या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहेत.

Lok Sabha Election 2024 : सरकार स्थापनाच्या घडामोडींना वेग; केंद्रात २ 'बाबूं'ची एन्ट्री, भाजपला ५ मंत्रिपदे गमवावी लागणार?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यां राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या पदाचा राजीनामा स्वीकारला आणि नवीन सरकारची स्थापना होईपर्यंत आणि कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केली.

दरम्यान,, आदल्या दिवशी असे वृत्त आले होते की, तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) सुप्रीमो चंद्राबाबू नायडू जे रविवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार होते. ते आता १२ जून रोजी शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यमुळे चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याची तारखेत हा बदल करण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply