Lok Sabha Election : राष्ट्रवादी अजित पवार गट तुळजाभवानी चरणी; लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी घातले साकडे

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा  निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होऊ लागली आहे. मात्र  भाजप, राष्ट्रवादी अजित पवव गट व शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीतील उमेदवारी घोषित होणे बाकी आहे. यामुळे धाराशिव मतदार संघातीलउमेदवारी मिळण्यासाठी अजित पवार गटाकडून तुळजाभवानीला साकडे घालण्यात आले.

धाराशिव लोकसभेची जागा ही महायुतीकडून राष्ट्रवादीला देण्यात यावी; यासाठी राष्ट्रवादीचे प्रा. सुरेश बिराजदार इच्छुक असुन त्यांनाच उमेदवारी मिळावी. यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी साकडे घातले आहे. धाराशिव लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही असुन सुरेश बिराजदार हे सक्षम नेतृत्व असुन त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यासाठी मोठी आग्रही मागणी केली जात आहे.  

Uddhav Thackeray : आमचं सरकार सत्तेत येतंय, तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ; उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ऑफर

तिन्ही पक्षांकडून दावा 

महायुतीमध्ये सध्या ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यातच भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे अजित दादांनी यामध्ये लक्ष घालुन ही राष्ट्रवादीला घेवुन प्रा. सुरेश बिराजदार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply