Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर! १६ नावांची केली घोषणा; येथे पाहा यादी

Lok Sabha Election 2024 Latest News : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलील्या या यादीमध्ये तामिळनाडूतील १५ आणि पुद्दुचेरीतील एका उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

या यादीनुसार चेन्नई उत्तरमधून आर. सी. पॉल कनगराज, तिरुवल्लूरमधून पॉन व्ही बालगणपति, तिरवन्नमलाई येथून ए अश्वथामन, नामक्कल येथून के पी रामलिंगम, त्रिपुर येथून एपी मुरुगनांदम, पोलाची येथीन के वसंतराजन, करून से वीवी सेंथिलनाथन आणि चिदंबरम येथून श्रीपती पी कार्तियायनी यांना तिकीट मिळालं आहे.

याव्यतिरीक्त नागपत्तिनम येथून एस जी रमेश, तंजावुर येथून एम मुरुगानंदम, शिवगंगा येथून देवनाथन यादव, मदुराई येथून राम श्रीनीवासन, विरुद्धनगर येथून राधिका शरतकुमार आणि टेनकासी येथून जॉन पांडियान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पुद्दुचेरीतील एकमेव लोकसभा जागेवर भाजपने नमाशिवायम यांना तिकीट दिलं आहे.

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दूध, भोजनाच्या कंत्राटांमधून सत्ताधाऱ्यांनी घेतली कोट्यावधींची दलाली - रोहित पवार

भाजपने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, पक्षाच्या तामिळनाडू शाखेचे अध्यक्ष के. अन्नामलाई आणि केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्यासह राज्यातील नऊ उमेदवारांचा समावेश आहे.

या यादीनुसार सौंदर्यराजन चेन्नई दक्षिणमधून तर मुरुगन निलगिरीमधून पक्षाचे उमेदवार असतील. अन्नामलाई यांना कोईबतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. चेन्नई सेंट्रलमधून व्ही. पी. सेल्वम, वेल्लोरमधून ए. सी. षण्मुगम, कृष्णागिरीतून सी. नरसिंहन, पेरंबलुरमधून टी. आर. परिवेंदर आणि तुतीकोरिन (तूतुकुडी) मधून एन. नागेंद्रन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

१९ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात

भाजपने २ मार्च रोजी १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, परंतु त्यापैकी भोजपुरी गायक-अभिनेता पवन सिंह आणि उत्तर प्रदेशचे उपेंद्र रावत या दोघांनी आपली उमेदवारी मागे घेतली. भाजपने १३ मार्च रोजी ७२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. १८ व्या लोकसभेसाठी १९ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार असून १ जूनपर्यंत ७ टप्प्यात मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील लोकसभेच्या ३९ जागांसाठी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतून भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply