Lok Sabha 2024 : आमचं सरकार गरिबांसाठी समर्पित; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या जाहीरनाम्याचं लोकार्पण

Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुक 2024च्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे . सर्वच पक्षांनी कंबर कसली असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. लोकसभा आणि गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. आज म्हणजेच 14 एप्रिल रोजी भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला  आहे. मोदींनी प्रधानमंत्री अवास योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला, किसान योजनेचं योजनेच्या लाभ मिळालेल्या व्यक्तीला आणि छत्तीसगडच्या बस्तरमधून आलेल्या महिलेला उज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यांना संकल्प पत्र दिलं आहे.

मोदींच्या नेतृत्वात आम्ही सगळे संकल्प पूर्ण केले, असं जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बोलताना सांगितलं आहे. २०१९ ला केलेलं संकल्प आम्हाला पूर्ण करण्यात मागच्या ५ वर्षात यश  आलं. जो आम्ही बोलतो ते आम्ही पूर्ण करतो, असंही ते म्हणाले आहेत. हे संकल्पपत्र तयार करण्यासाठी दिवस रात्र आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं आहे.

Maharashtra Weather Forecast : पुढील ७२ तास अवकाळीचं संकट कायम; 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही संकल्पपत्र तयार केलं आहे. देशाची सेवा कशी करता येईल, हे सगळं आम्ही संकल्प पत्रात ठेवलं आहे. रस्त्यांचं जाळं मोदींच्या काळात निर्माण झालं. आरोग्य, घरकुल योजना, महिला सन्मान, उज्वला योजना अशा अनेक योजना सुरू (BJP Sankalp Patra) केल्या.

देशातील जनतेने स्पष्ट बहुमत दिलं, आम्ही तसं काम करून दाखवलं. कलम ३७० हटवून टाकलं, हे स्पष्ट बहुमत दिल्यामुळं होऊ शकलं. भव्य राम मंदिर बांधत प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या थाटा माटात पार पडला. मतांचं राजकारण (Lok Sabha) करणाऱ्या काँग्रेसच्या लोकांनी कायम विरोध केला. नारी शक्ती वंदन विधेयक सर्वांच्या आशीर्वादाने विधेयक मंजूर करून दाखवलं. ३० वर्षांपासून हे विधेयक मंजूर होत नव्हतं, ते ३ दिवसात मंजूर करून दाखवलं.

कोविड काळात अनेक देश संभ्रमात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देशात लॉकडाऊन लावला. या मोठ्या संकटातून वाचण्यासाठी मोदींनी स्ट्रॅटजी तयार केली. फक्त देशालाच नाही तर अनेक (BJP) देशांना आपण वॅक्सीन पोहोचवलं आहे. १० वर्षात देशाने मान्य केलं आहे की, मोदींची गॅरंटी ही गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे.

भाजपने आपल्या जाहीरनाम्याला संकल्प पत्र असं नाव दिलं आहे. भाजपच्या मुख्यालयात सकाळी 10 वाजता भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी (Politics) नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. भाजपचा जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारत' अजेंड्यावर केंद्रित असेल, अशी अपेक्षा आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply