Lalit Patil Case : ललित पाटील प्रकरणी मोठी घडामोड: ससूनमधील क्लार्क अन् नर्सेसची चौकशी सुरू; मोठ्या कारवाईची शक्यता

Lalit Patil Case :  राज्यात सध्या ड्रग्जमाफिया ललित पाटीलचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीचे आरोप असलेल्या ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालय चांगलेच अडचणीत आले असून ललित पाटीलचे पलायन आणि त्याच्या रुग्णालयातील मुक्कामावरुन ससूनच्या क्लार्क आणि नर्सेसची सध्या चौकशी सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ड्रग्जमाफिया ललित पाटीलने पलायन केल्यानंतर पुण्यातील ससून रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात अडकले. ललित पाटीलला पळून जाण्यात कोणी मदत केली का? गेले ९ महिने त्याच्यावर रुग्णालयात कोणते उपचार सुरू होते. त्याच्या मुक्कामासाठी कोण प्रयत्न करत होते. यासंबंधाची कसून चौकशी सध्या सुरू असून ससून रुग्णालय हे चौकशीचे केंद्रबिंदू ठरत आहे.

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला जाणारी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात उलटल्याने भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू

ललित पाटीलवर ससून रुग्णालयात उपचार करणारे वरिष्ठ डॉक्टर, लेकचरर, एक्स रे तज्ञ आदी कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पहिल्यापासून विरोधकांच्या रडावर असलेले डॉक्टर संजीव ठाकूर आणि त्यांच्या पथकातील डॉक्टरांचीही चौकशी सुरू असून या प्रकरणी दोषी आढळल्यास मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ललित पाटील प्रकरणात पहिल्यापासून विरोधकांकडून गृहमंत्री आणि राज्य सरकारच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शिंदे गटाच्या मंत्र्यांचा हात असल्याचा मोठा आरोप केला आहे. तसेच कॉंग्रेस नेते रविंद्र धंगेकरयांनीही या प्रकरणी आवाज उठवत ससूनच्या डीनवर मोठ्या कारवाईची मागणी केली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply