Lalit Patil Arrested : मोठी बातमी! ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला चेन्नईमधून अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Lalit Patil Arrested : गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. लवकरच त्याला महाराष्ट्रात आणलं जाणार असून कोर्टात हजर केलं जाणार आहे. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी १० पथकं तयार करण्यात आली होती. 

दरम्यान, ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. त्याला आता पुण्यात आणलं जाणार असून कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad : 'ड्रीम 11' वर PSI रातोरात झाला कोट्यधीश, पण आता उडाली झोप; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते.

नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले.

दरम्यान या तपासाप्रकरणी पुणे पोलिसांसह नाशिक पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एक पोलीस आमच्या घरी आला होता. पोलीस आणि राजकारणी मिळून तुमच्या मुलाचा एन्काऊंटर करणार असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं, असा आरोप ललित पाटील याच्या आईने केला होता.

पोलीस आमच्या घरी येऊन तपास करत आहेत. आमच्या घरी सोनं वगैरे काही सापडलं नाही. घरात फक्त माझं मंगळसूत्र आहे. सध्या ललित कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. एक-दोन वेळेस तो घरी आला होता. पोलीस ललितचा एन्काऊंटर करणार असल्याची आम्हाला भीती आहे, अशी प्रतिक्रिया ललितच्या आईने दिली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply