Kolhapur News : बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय, काेल्हापुरात डॉक्टर अटकेत; दाेघांकडून गर्भलिंग निदानाचे साहित्य जप्त

Kolhapur News : गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या संशयावरून तीन एजंट व एका डाॅक्टरला काेल्हापूर पाेलिस दलाने अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार डॉ. हर्षल रवींद्र नाईक-परुळेकर असे अटक केलेल्या वैद्यकीय अधिकारी याचे नाव आहे. या कारवाईत गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भलिंग निदानासाठीचे इतर साहित्य पाेलिसांनी जप्त केले आहे.

पाेलिसांनी प्रयाग चिखली येथील एजंटकडून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या तसेच मडिलगे येथील एजंटकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि गर्भलिंग निदानासाठीचे इतर साहित्य जप्त केले आहे.गारगोटी परिसरात गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा पोलिसांना संशय हाेता. ताे या कारवाईतून खरा ठरला.

Thane Crime News : धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

या कारवाईत युवराज गोविंद चव्हाण (वय ३९, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), संजय कृष्णात पाटील (भोई गल्ली, वरणगे पाडळी, ता. करवीर), डॉ. हर्षल रवींद्र नाईक-परुळेकर (गंगा लॉनजवळ, फुलेवाडी रिंगरोड), विजय लक्ष्मण कोळसकर (मडिलगे खुर्द, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांना अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. अधिक तपास सुरु असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply