Kolhapur Crime : पळून जाऊन लग्न केलं, मामा संतापला, भाचीच्या लग्नातील जेवणात कालवलं विष

Kolhapur Crime : कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाचीने पळून जाऊ लग्न केलं त्यामुळे संतापलेल्या मामाने आपल्या भाचीच्या लग्नातील जेवणामध्ये विष कालवलं. मामाला जेवणात विष टाकताना आचाऱ्याने पाहिलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला मामाविरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकले. कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावामध्ये ही घटना घडली आहे. भाचीने आठवड्यापूर्वी गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केले. भाचीने आपल्या मनाविरोधात जाऊन लग्न केले त्यामुळे आपली बदनामी झाल्याचा मामाला प्रचंड राग आला. या रागातून मामाने धक्कादायक कृत्य केले.

मामाने आपल्या भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणामध्ये विषारी औषध टाकून आपलेल्या पाहुण्यांच्या जीवाला धोका पोहचवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आला. जेवनात विषारी औषध टाकताना मामा आणि आचाऱ्याची झटापट झाली. आचाऱ्याच्या समोरच मामाने जेवणामध्ये विषारी औषध टाकल्याचा प्रकार घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

महेश जोतीराम पाटील असे या मामाचे नाव आहे. या घटनेनंतर मामा फरार झाला आहे. पन्हाळा पोलिसांनी महेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ते त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे लग्नाला आलेले पाहुणे घाबरले. लग्नाच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर सर्व पाहुणे निघून गेले.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply