Kolhapur Election Results : मूळ शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे सेना उरली नावापुरतीच ! आजी- माजी आमदार गमावले

Kolhapur  : मूळ शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर उभारी घेण्यासाठी प्रयत्न करणारी ठाकरे सेना जिल्ह्यात आता केवळ नावापुरताच राहिली आहे. एकही आमदार नसल्यामुळे मरगळलेल्या ठाकरे सेनेला एखाद्या आमदाराने उभारी मिळेल, या आशेचाही आता भंग झाला आहे. विधानसभा निवडणुकीने ठाकरे सेनेला (Thackeray Sena) त्यांचे स्थान दाखवून दिले आहे. जनतेशी नाळ जोडण्याचे आव्हान आता ठाकरेसेनेसमोर उभे राहिले आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेचे एकेकाळी सहा आमदार आणि दोन खासदार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुण्याईमुळे महापालिकेसह खासदारकीपर्यंत शिवसेनेने चांगले संघटन केले होते. त्यांनी जिल्ह्यात आपली ताकद वाढविली होती. त्यांच्या बिंदू चौकातील जाहीर सभेस मोठा प्रतिसाद मिळत होता. 'वाघ तो वाघ' म्हणून शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांत शिवसेनेच्या शाखा निघत होत्या. त्या फलकावर शाखा क्रमांक लिहिला जात होता. त्या फलकावर ठाकरे आणि वाघाचे छायाचित्र असायचे.

संघटन काय असते हे त्यांनी कोल्हापुरात दाखवून दिले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला सुरुंग लावला. एक शिवसेना दुभंगली. आजपर्यंत शिवसेनेने असे अनेक धक्के जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पचवले होते. मात्र, येथे धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचेही नाव पळविल्यामुळे शिंदेंचा प्रभाव ठाकरेंना रोखता आला नाही.

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...


ज्या शिवसेनेचा प्रचार प्रारंभ कोल्हापुरातून होत होता, तेथेच विधानसभेला ठाकरे सेनेला एकही आमदार मिळविता आला नाही. निवडणुकीत एका रात्रीत दुसत्या पक्षातून आलेल्या के. पी. पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. परंतु, कट्टर शिवसैनिक असलेल्या सत्यजित पाटील-सरुडकर यांच्यासाठी एकही जाहीर सभा घेतली नाही. त्याचबरोबर ठाकरे सेनेत असलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील या दोघांनाही उमेदवारी न मिळाल्याने पक्ष बदलला. त्यांना थांबविणेही ठाकरे सेनेला शक्य झाले नाही. त्यामुळे उरलीसुरली ताकदसुद्धा या निवडणुकीत संपली की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठाकरे सेनेची अद्यापही पाहिजे तितकी नाळ जनतेशी जुळली नाही. त्यांचा कनेक्ट किती आहे, त्यांचे अंतर्गत राजकरण या सर्वांचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. एखादा आमदार पक्षात असेल तर तेथील कार्यकर्त्यांना उभारी मिळते. गल्लीबोळातील कामे करून घेण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. शासकीय अधिकाऱ्याऱ्यांसोबत बैठक लावता येते. मात्र, यावर आता ठाकरे सेनेच्या कार्यकत्यांना मर्यादा येणार आहेत. त्याना पुन्हा एकदा ओमाने सच्चा शिवसैनिक तयार करावा लागणार आहे.
ज्या ताकदीने पूर्वीची शिवसेना आक्रमक होती, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उत्तरत होती, तो कट्टर शिवसैनिक तयार करावा लागणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकही नेता रसद पुरविणार नाही. खंबीर बैंकबोन नाही. राज्य पातळीवरील नेत्यांचा म्हणावा तितका प्रभाव कोल्हापुरातील जनतेवर नाही, कार्यकर्त्यांवर नाही. त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

दृष्टिक्षेपात...

पक्षाच्या माजी आमदारांचा रामराम

संघटनवाढीला आल्या मर्यादा

अपेक्षित मतदारसंघ न मिळाल्याने कार्यकार्याची नाराजी

जिल्ह्यात खबीर पक्ष नेतृत्वाचा अभाव

कार्यकत्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply