KKR vs SRH, IPL 2024 : IPL फायनल हैदराबादचा संघ रचणार इतिहास! याआधी केवळ मुंबईने केलाय असा रेकॉर्ड

KKR vs SRH, IPL 2024 : आयपीएल २०२४ स्पर्धेचा फायनलचा सामना आज चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. ही लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने चौथ्यांदा स्पर्धेची फायनल गाठली आहे. तर सनरायझर्स हैदराबादने तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. कोलकाताचा संघ तिसऱ्यांदा तर हैदराबादचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना जिंकून सनरायझर्स हैदराबादला इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेत हैदराबादच्या फलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला आहे. प्लेऑफमध्ये या फलंदाजांच्या बॅटला गंज लागल्याचे पाहायला मिळाले आहे. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांना चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. फायनलमध्ये या दोघांची बॅट तळपली तर कोलकाताच्या गोलंदाजांची काही खैर नाही. हैदराबादला क्वालिफायर १ मध्ये कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

SRH Vs RR : मोठे धमाके करणाऱ्या हैदराबादला राजस्थानने १७५ धावांत रोखलं


क्वालिफायर गमावल्यानंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केवळ मुंबई इंडियन्सला करता आला आहे. जर हैदराबादने फायनलचा सामना जिंकला तर, हैदराबादचा संघ क्वालिफायरचा सामना गमावून ट्रॉफी जिंकणारा दुसराच संघ ठरेल.

मुंबई इंडियन्सनेहा कारनामा एकदा नाहीतर दोनदा केला आहे. २०१३ आणि २०१७ मध्ये झालेल्या हंगामात मुंबई इंडियन्सला क्वालिफायर १ च्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या हंगामात मुंबईने क्वालिफायर २ चा सामना जिंकून आयपीएलची ट्रॉफी देखील जिंकली. २०१३ मध्ये झालेल्या हंगामात मुंबई इंडियन्सने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर २०१७ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत जेतेपदाचा मान मिळवला.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply