Khadakwasla Dam Water level : खडकवासला प्रकल्पातील धरणांत ७४.९२ टक्के पाणीसाठा

खडकवासला : या आठवड्यातील शेवटच्या दोन दिवसांत पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी चार ही धरणांतील पाण्याचा येवा (आवक) कमी झाला आहे. त्याचबरोबर पाणीसाठ्यात होणारी वाढ कमी झाली आहे.

खडकवासला प्रकल्पातील धरणांत २५ जुलै रोजी जास्त पाऊस झाला. त्या दिवशी म्हणजे २४ तासांत १२७८ दशलक्ष घनफूट येवा(आवक) झाला होता.

मागील काही दिवस ९०० ते ८०० दशलक्ष घनफूटपर्यंत होता. शनिवारी सकाळी मागील २४ तासांतील येवा ७५१ दशलक्ष घनफूट होता. शुक्रवारी ११ तासांत २७९ होता, शनिवारी अकरा तासात १८१ दशलक्ष घनफूट होता. म्हणजे पाणी जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Pune : आमच्यावर आलेली वेळ कुणावरही येऊ नये, माळीणवासीयांची भावना; दुर्घटनेच्या नऊ वर्षांनंतरही वेदना कायम

खडकवासला धरणातून शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४२८ क्युसेक पाणी मुठा नदीत पाणी सोडले जात आहे. पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरण शंभर टक्के भरले की, जादा पाणी मुठा नदीत सोडले जाणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाने सांगितले.
शनिवारी दिवसभरात खडकवासला येथे दोन, पानशेत येथे चार, वरसगाव येथे आठ, टेमघर येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे.

धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी) / उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी
खडकवासला- १.९७ / १.९३ / ९७.७०
पानशेत- १०.६५ / ८.५५ / ८०.२५
वरसगाव- १२.८२ / ९.३४ / ७२.८४
टेमघर- ३.७१ / २.०३ / ५४.६९

चार धरणातील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी
शनिवारचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २१.८४ टीएमसी म्हणजे ७४.९२ टक्के



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply