जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये काश्मिरी पंडित महिलेची हत्या, दहशतवाद्यांनी शाळेत घुसून झाडल्या गोळ्या

जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. दहशतवाद्यांनी कुलगाममधील मंगळवारी गोपालपुरा भागात असलेल्या शाळेमध्ये घुसून महिला शिक्षिकेवर गोळीबार केला. या घटनेत महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली. त्यानंतर या महिला शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कुलगामच्या गोपालपुरा भागात दहशतवाद्यांनी एका महिला शिक्षकावर गोळीबार केल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी ट्विट करून माहिती दिली आहे. रजनी असे या शिक्षकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. ती सांबा येथील रहिवासी असून तिच्या पतीचे नाव राजकुमार आहे. ती कुलगाम गोपालपोरा भागात असलेल्या शाळेमध्ये शिक्षिकेचं काम करत होती.

या प्राणघातक गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा लवकरच शोध घेऊन त्यांचा खात्मा केला जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरिना यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर पुन्हा आता शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply