Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त पंढरपुरात ३ हजार पोलीसांचा राहणार वाॅच, बंदोबस्तासाठीची ऑनलाइन प्रणाली विकसीत

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी वारीत भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल तीन हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची करडी नजर आता पंढरपुरात असणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पोलिसांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे बंदोबस्त तयार केला आहे. त्याबाबतची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

पंढरपुरात येत्या 23 नोव्हेंबरला कार्तिकीचा सोहळा साजरा होणार आहे. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाने पंढरपूरात जय्यत तयारी केली आहे. कार्तिकी निमित्त भाविकांना 30 नोव्हेंबरपर्यंत विठूरायाचे 24 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Dhangar Reservation Protest : जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

कार्तिकी वारीत भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल तीन हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच पोलिसांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे बंदोबस्त तयार केला आहे. क्यू आर कोड आणि ऑनलाईन सिस्टीम द्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या बंदोबस्ताचे ठिकाण, सुट्टीच्या वेळा, आपतकालीन यंत्रणेतील सूचना ह्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहेत.

ऑनलाइन बंदोबस्ताची प्रणाली महाराष्ट्र पोलिसांमध्ये प्रथमच यंदाच्या कार्तिकी वारीपासून पंढरपुरात राबवली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताचा मार्ग यंदा सुकर हाेणार आहे. दरम्यान  कार्तिकी एकादशी दिवशी महापूजेसाठी उपमुख्यमंत्री येतील असा अंदाज असल्याने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ पाेलीस अधिका-यांनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply