Kalyan : रस्त्यावर उभ्या जेसीबीला टेम्पोची धडक; टेम्पो चालक जखमी, कल्याण मधील घटना

Kalyan : रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी कल्याण फडके मैदान परिसरात घडली आहे. या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

कल्याण पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके मैदानासमोरील सुभाष नगर येथे आज सकाळी झाडाची भलीमोठी फांदी तुटून रस्त्यावर पडल्यामुळे रस्ता बंद होता. ही फांदी जेसीबीमार्फत बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान ही भलीमोठी फांदी जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने बाजूला केली जात असताना एक टेम्पो त्याच मार्गावरून लालचौकीकडे भरधाव येत होता.

Coal Scam: विजय दर्डा-देवेंद्र दर्डा पितापुत्रांना चार वर्षांचा कारावास; दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल

जेसीबीचालक आणि त्या शेजारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आतच या टेम्पोने जेसीबीला धडक दिली. या अपघातात जेसीबीचा मागचा पंजा पुढची काच तोडून टेम्पो थेट केबिनमध्ये घुसला. ज्यामध्ये हा टेम्पो चालक त्यात अडकून पडला. सुदैवाने टेम्पो चालक बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply